बोनस जमा होण्याची तारीख फिक्स, या तारखेला मिळणार शेतकऱ्यांची बोनस


नमस्कार शेतकरी मित्रांनो जेव्हापासून शेतकरी आपले धान सरकारी संस्थेत विक्री केली तेव्हापासून आतापर्यंत बोनस जमा होण्याची वाट पाहत असतील. त्यातच आता सोमवारपासून सरकारच्या ऑनलाईन पोर्टल वर नोंदणीकृत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्‍टरी 20 हजार रुपये असे दोन हेक्‍टरपर्यंत 40 हजार रुपये जमा होणार आहेत.

बोनस जमा होण्याची तारीख फिक्स, या तारखेला मिळणार शेतकऱ्यांची बोनस

डिसेंबर मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नोंदणीकृत शेतकऱ्यांचा खात्यात 20 हजार हेक्टर दोन हेक्टर पर्यंत बोनस देण्याचे घोषणा केली होती. मात्र सरकारी संस्थेंना सलग सुट्ट्या व एनईएमएल पोर्टलवर याद्या अपडेट न झाल्याने सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस ची रक्कम जमा करण्यात येणार आहे.


शेतकऱ्यांना मात्र याची आतुरतेने वाट होती. कारण शेतकरी आपला शेत शिवारा च्या कामासाठी सरकारी संस्थेकडून कर्ज उचलला असतो त्याची परतफेड करण्यासाठी बोनस ची रक्कम ही अति आवश्यक असते. तसेच शेतकऱ्यांची मागणी होती की 31 मार्च पूर्वी बोनस चे पैसे जमा व्हायला हवी होती. मात्र ते होऊ शकले नाही परंतु ते बोनस चे पैसे सोमवार दिनांक 1 एप्रिल 2024 पासून सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे.


हे शेतकरी असणार पात्र

ज्या शेतकऱ्यांनी सरकारी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी , ईपीक पाहणी केल्या अशा सर्व शेतकऱ्यांना 20 हजार रुपये बोनस दोन हेक्टर पर्यंत जमा करण्यात येणार आहेत. तसेच खरीप हंगाम 2023-24 मध्ये धान लागवडीखाली नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना (नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो) या शेतकऱ्यांच्या सुद्धा खात्यात हेक्टरी 20 हजार रुपये जमा केली जाणार आहेत.


Read also
 
गुढीपाडवा निमित्त मिळणार आनंदाच्या शिधा.💯


Conclusion

मित्रांनो आजची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि अशा प्रकारच्या पोस्ट वाचायला आवडत असेल तर आपल्याला फॉलो नक्की करा. तसेच आपल्या गावातील शेतकरी मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा. जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मुक्तपणे कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद!

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.