10 वी, 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार, तुमचं नाव चेक करा | SSC HSC Board Exam Fees Refund 2024


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या वतीने 2 एप्रिल 2024 रोजी परिपत्रक जाहीर केला आहे. यामध्ये 2023-24 या कालावधीत ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत करण्याच्या निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तरीपण आपण जर विद्यार्थी असाल तर हा पोस्टला शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून सर्व माहिती आपल्याला माहिती व्हायला हवी.

10 वी, 12 वी विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार, तुमचं नाव चेक करा | SSC HSC Board Exam Fees Refund 2024

महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या वतीने जाहीर केलेला परिपत्रक मध्ये 2023 24 या कालावधीत दहावी बारावी चे परीक्षा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांना काही भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा फी हे परत करण्यात येणार आहे. आपण यासाठी पात्र आहात की नाही ते या पोस्टमध्ये जाणून घेऊया.



ह्या विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा फी परत

टंचाई किंवा दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा फी परत करण्याचे महत्वपूर्ण निर्णय हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड कडून घेण्यात आलेले आहे. जर तुम्ही सुद्धा पाणीटंचाईच्या किंवा दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी असाल तर तुमचे सुद्धा फी परत केले जाणार आहे. यामध्ये 40 तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा फी परत केले जाणार आहे.



ह्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा फी परत
  • जालना
  • बदनापूर
  • अंबड
  • मंठा
  • छत्रपती संभाजीनगर
  • सोयगाव
  • मालेगाव
  • सिन्नर
  • येवला
  • पुरंदर सासवड
  • बारामती
  • वडवणी
  • धारूर
  • आंबेजोगाई
  • रेनापुर
  • वाशी
  • धाराशिव
  • लोहार
  • बार्शी
  • माळशिरस
  • सांगोला
  • सिंदखेडा
  • बुलढाणा
  • लोणार
  • शिरूर
  • घोडनदी
  • दौंड
  • इंदापूर
  • करमाळा
  • माढा
  • वाई
  • खंडाळा
  • हातकणंगले
  • गडहिंग्लज
  • शिराळा
  • कडेगाव
  • खानापूर
  • विटा
  • मिरज
तर मित्रांनो असे हे 40 तालुके आहेत. या तालुक्यातील विद्यार्थ्यांचे फी परत करण्यात येणार आहे जर तुम्ही या तालुक्यात येत असाल तर आपल्या कॉलेज किंवा शाळांमध्ये पासबुकची झेरॉक्स आणि मागवलेल्या डॉक्युमेंट्स लवकरात लवकर पोहोचवून द्यावी.



इतर तालुकांना नाही मिळालं. काय करायचे?

मात्र इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना हे परीक्षा फी परत करण्याचा निर्णय महाराष्ट्र स्टेट बोर्ड घेतलेला नाही. यामुळे आपण याचा निषेध सर्व विद्यार्थ्यांनी मिळून केला पाहिजे. आणि फी परती चा निर्णय सर्वांनी याचा लाभ मिळाला पाहिजे कारण खूप सारे तालुक्यात गरिबांचे मुलं आहेत. त्यांना सुद्धा न परवडणारे फी भरून मुलांना शिकवण्याची इच्छा बाळगतात तर त्यासाठी आपण दबाव गट निर्माण करून त्याच्या निषेध करण्याच्या प्रयत्न करू शकता.




यासाठी पात्र आहात की नाही असे करा चेक

मित्रांनो जर तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही हे चेक करायचे असेल तर महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या ऑफिशियल साईट मध्ये जाऊन आपलं सीट नंबर टाकून चेक करू शकता. जर त्या ठिकाणी ह्या निर्णयाबद्दल तुमचे नाव असेल तर समजून घ्यावे तुम्ही यासाठी पात्र राहणार आहात. किंवा दिलेल्या 40 तालुक्यांचे निरीक्षण करून जर तुम्ही या तालुक्यातील विद्यार्थी असाल तर यासाठी पात्र राहणार आहात.



Conclusion 

तर मित्रांनो आजच्या पोस्ट मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड च्या निर्णय बद्दल सांगितलेला आहे अशा प्रकारच्या माहिती आपला मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा धन्यवाद!
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.